SR 24 NEWS

जनरल

युवकांनी स्पर्धेत उतरून, स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे गरजेचे-माजी मंत्री मधुकर चव्हाण

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : सध्याचे युगे हे स्पर्धेचे व आव्हानात्मक असून युवकांनी न्यूनगंड बाजूला सारून विविध स्पर्धेत उतरून स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण करून विविध आव्हानास सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री मधुकर चव्हाण यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा अणदूरचे सरपंच रामचंद्र आलूरे हे होते.

स्वर्गीय सि.ना.आलूरे गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेत 16 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आरक्षण हे सामाजिक न्यायाचे साधन आहे की राजकारण या विषयावर विद्यार्थ्यांनी विविध अंगी बाजू मांडून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाळ्यांचा पाऊस पाडला.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, हा विषय अतिशय संवेदनशील असून ते समजून घेऊन विविधअंगीं मांडणी करून हाताळल्यास जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

अध्यक्षीय समारोपात बोलताना रामचंद्र आलुरे म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागात शिक्षणाचे मुहूर्तमेढ आदरणीय गुरुजींनी रोवल्यानेच असंख्य विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकिक करताना दिसतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन मिळावे यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध स्पर्धा, राबवून ग्रामीण भागातील संस्था ही सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याची भावना व्यक्त करून तरुणांनी शिक्षण हे केवळ नोकरीचे साधन म्हणून विचार न करता स्पर्धेच्या युगातही आदर्श नागरिक होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले . 

या अटीतटीच्या व बौद्धिक वाद-विवाद व सुसंवादातून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक वरून घरटे, तेजस पाटील-सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, द्वितीय पारितोषिक-रोहन कवडे, नितीन गागरे -संस्कार विद्यापीठ पुणे, तृतीय पारितोषिक -आकाश मोहिते, महेश उशीर-आर्ट्स कॉमर्स सायन्स पारनेर, उत्तेजनार्थ अवधूत देशमुख, माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज संभाजीनगर, प्रभावी वक्ता अनुकूल बाजूने समर्थ लोंढे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग, प्रभावी वक्ता प्रतिकूल बाजूने प्रथमेश गिरी माणिकचंद पाडेगाव कॉलेज संभाजीनगर या यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र महाविद्यालयाचे विकास समिती सदस्य एड. लक्ष्मीकांत पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

यावेळी सूर्यवंशी सर उपस्थित होते. परीक्षक म्हणून एड. वडगावकर, पत्रकार रवींद्र केसकर, पत्रकार अरविंद जोशी यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उमाकांत चनशेट्टी , सूत्रसंचालन डॉ. अनिता मुदकन्ना तर आभार डॉ. राजशेखर नळगे यांनी मांनले. यावेळी एड. दीपक आलूरे, बालाजी घुगे, डॉ. अशोक चिंचोले, चंद्रशेखर कंदले सह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयीन प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!