पंढरपूर प्रतिनिधी : पंढरपूर शहरात नगरपालिकेने शहरी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी पत्रकार भारत कवितके यांनी केली आहे, सध्या पंढरपूर शहराच्या कक्षा फारच विस्तारित झाल्या आहेत. गोपाळपूर,रांजणी,वाखरी,भंडीशेगाव कोर्टी,तिसंगी,खर्डी,एकलासपूर,पेनूर अशा पंढरपूरच्या आसपासच्या परिसरात जाण्या येण्यासाठी अथवा पंढरपूर मधील अनेक ठिकाणी म्हणजे सिंहगड कॉलेज, भाऊराव पाटील काॅलेज,इसबावी, अंबाबाई मैदान,उमा कॉलेज, रेल्वे स्थानक,जुना कराड नाका, सांगोला नाका,नाथ चौक, शिवाजी पुतळा,नवी पेठ,तांबडा मारुती वगैरे वगैरे ठिकाणी जाण्यासाठी शहरातील रिक्षा वाले मनमानेल तसे प्रवाशांकडून पैसे घेतात, रिक्षा शिवाय पर्याय नसल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
सन १९७७ ..७८ साली पंढरपूर नगरपालिकेने शहरी बस सेवा सुरू केली होती.परंतु प्रवासी वर्गानी पुरेसा साथ दिला नाही, प्रवासी मिळत नाही हे कारण सांगून ती बस सेवा बंद करण्यात आली होती,पण त्या वेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे, त्या वेळी शहराच्या कक्षा मर्यादित होत्या,पण आता मात्र तसे नाही,आज पंढरपूर येथील नागरिकांना बस सेवेची आवश्यकता आहे, आता बस सेवेला नागरिकांना फायदा होईल, आर्थिक अडवणूक होणार नाही,या साठी पंढरपूर नगरपालिकेने लवकरच पंढरपूर करासाठी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी पत्रकार भारत कवितके यांनी केली आहे.
Leave a reply













