SR 24 NEWS

राजकीय

सहाय्यक साधनांच्या वाटप शिबिरातून ७२१ ज्येष्ठ नागरिकांना लाभ – सुरेश बानकर

Spread the love

ब्राम्हणी प्रतिनिधी ( ज्ञानेश्वर सुरशे) : ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानपूर्ण आणि स्वावलंबी जीवनासाठी ब्राम्हणी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत सहाय्यक साधनांच्या वाटप शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ७२१ ज्येष्ठ नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सहाय्यक साधनांसाठी पात्रता देण्यात आली. लवकरच या लाभार्थ्यांना साधनांचे वितरण मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील व अक्षय कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश बानकर यांनी दिली.

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि ग्रामपंचायत ब्राम्हणी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २ नोव्हेंबर व सोमवार, दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी हे शिबिर झाले. ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सहाय्यक साधनांची ६७ लाख १३ हजार २३८ रुपये इतक्या खर्चातून तरतूद करण्यात आली असून, हा उपक्रम अनेक ज्येष्ठांना चालणे, ऐकणे, पाहणे, संतुलन राखणे यांसारख्या दैनंदिन गरजांसाठी मोठा आधार देणारा ठरणार आहे.

या प्रसंगी वारकरी संप्रदाय तालुकाध्यक्ष बाळकृष्ण नाना बानकर, माजी जि.प. सदस्य विक्रम तांबे, सरपंच सौ. सुवर्णाताई बानकर, उपसरपंच महेंद्र तांबे, विजय बानकर, सोसायटी चेअरमन शिवाजीराजे भागवत देशमुख, दादा हापसे यांसह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक मंडळ व मान्यवर उपस्थित होते.

शिबिरामध्ये प्रधानमंत्री दिव्यांशा केंद्र, अहिल्यानगर येथील डॉ. भालेराव, डॉ. मेरेकर, डॉ. अनाप व त्यांच्या टीमने मोलाचे योगदान दिले. ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सहकार्य केले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिक व समाजघटकांतून मनःपूर्वक कौतुक होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!