भारत कवितके (मुंबई कांदिवली पश्चिम) : कांदिवली पश्चिममध्ये जगद्गगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवाचे आयोजन ज्ञानोबा तुकाराम वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ ( वासकर फड) कांदिवली पश्चिम यांच्या वतीने करण्यात आले आहे,या वेळी दिनांक ३ मार्च २०२६ ते दिनांक ५ मार्च २०२६ पर्यंत दररोज पहाटे ४ते ६ काकड आरती,७ ते १२ आणि दुपारी २ ते ४ मंचरी पारायण व ४ते ५ हरिपाठ हे भक्तीमय कार्यक्रम वांझा वाडी,मथुरादास रोड, चव्हाण हायस्कूल जवळ, कांदिवली पश्चिम या ठिकाणी होणार आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत निळोबा राय यांनी निवेदन करून ठेवलेल्या परंपरेनुसार बीजोत्सवा निमित्ताने मंचरी पारायण, प्रवचन, कीर्तन,हरिजागर इत्यादी कार्यक्रम होणार असून यांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे, कीर्तनास साथ गायक ह.भ.प.श्री.संदीप सकपाळ,मृदुंगमणी हे.भ.प.श्री.दिलीप कुचेकर,ह,भ.प.श्री.रविंद्र तावडे, ह.भ.प.श्री.नंदकुमार वरळीकर, ह.भ.प.श्री.निवृत्ती तावडे, यांची असेल, दिनांक ५ मार्च २०२६ रोजी बीजे निमित्त दुपारी ११ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
Leave a reply













