सोनई प्रतिनिधी / मोहन शेगर : अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सोनई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी एका महिलेचाही सहभाग समोर आला असून तिचा शोध सुरू आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, अर्जुन मारुती ओव्हळ (वय ६६ वर्ष, व्यवसाय – सेवानिवृत्त व शेती, रा. मुळा कारखाना, मराठी शाळेच्या पाठीमागे, सोनई ता. नेवासा) यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय, अहील्यानगर येथे जाऊन सोमनाथ घार्गे यांची प्रत्यक्ष भेट घेत तक्रार मांडली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षकांनी तात्काळ सोनई पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले व संबंधित आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना केल्या.फिर्यादीनुसार, दिनांक २० फेब्रुवारी २०२६ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान भाग्यक्षी जाधव (गायधने) (पूर्ण पत्ता – रा. श्रीरामपूर) या महिलेने फिर्यादींना वेळोवेळी फोन व संदेश पाठवून अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग केल्याचे सांगत तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
तसेच अनिकेत अशोक नेटके, किशोर जयसिंग साळवे, कृष्णा सुभाष वैरागर व गौरव अरुण वाघमारे (सर्व रा. ब्राम्हणी ता. राहुरी) यांनी फिर्यादींच्या घरात अनधिकृत प्रवेश करून १० लाख रुपयांची मागणी केली. आरोपींनी १०,००० रुपये रोख घेतले असून उर्वरित रक्कम न दिल्यास संबंधित व्हिडिओ व संदेश नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
याशिवाय, फिर्यादींकडून पैसे उकळण्यासाठी त्यांची दुचाकीची चावी घेऊन त्यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून सोनई येथील एसबीआय बँक शाखेत नेण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी सोनई पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ७६/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०८(२), १३७, ३३२, ३५१(२)(३), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तत्काळ कारवाई केली. आरोपी क्रमांक २ ते ४ यांना त्यांच्या राहत्या घरी जाऊन ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान समाधानकारक माहिती न दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोहेकॉ बाळासाहेब बाचकर करीत आहेत.
ही कारवाई सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, पोहेकॉ बाळासाहेब बाचकर, आप्पा तमनर, निखील तमनर व गणेश गावडे यांचा सहभाग होता. दरम्यान, फरार महिला आरोपीचा शोध सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
सोनईत अर्धनग्न व्हिडीओ व्हायरलची धमकी देत १० लाखांची खंडणीने खळबळ सोनई पोलिसांकडुन खंडणी प्रकरणातील आरोपी दोन तासात जेरबंद

0Share
Leave a reply












