SR 24 NEWS

क्राईम

वांबोरीत ७४ वर्षीय वृद्धाच्या घरात चोरी; सव्वा लाखांचा ऐवज लंपास

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात चोरीची खळबळजनक घटना उघडकीस आली असून ७४ वर्षीय वृद्धाच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. फिर्यादी रखमाजी शंकर शेजवळ (वय ७४, रा. वांबोरी) हे २३ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे १०:१५ वाजता आपल्या राहत्या घरी असताना अज्ञात इसमाने संधी साधून त्यांच्या ताब्यातील मुद्देमाल चोरून नेला. चोरट्याने ७५ हजार रुपये किमतीचे पावणे तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण तसेच ३२ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १७६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ पुढील तपास करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!