नायगाव प्रतिनिधी/धम्मदिप भद्रे :महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य विमा योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांची मोफत तपासणी व मोफत औषधि वाटप तसेच विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे.तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन अवकाश पाटील धुपेकर यांनी केले आहे.
या शिबिरामध्ये हृदयरोग, किडनी विकार, मधुमेह, कर्करोग, थायरॉईड, रक्तदाब तसेच इतर गंभीर आजारांवरील उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून सदर शिबिरात नांदेड येथिल नामांकित तूकामाई दवाखान्याचे प्रमुख डाॅ. दत्तात्र्य काळे साहेब यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार असून, रुग्णांची तपासणी करून आवश्यक त्या उपचारांची माहिती देण्यात येईल.
हे मोफत आरोग्य शिबिर दि. २७/०२/ २०२६ रोजी शुक्रवार सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत छत्रपत्ति राजर्षी शाहु महाराज मगल कार्यालय शेळगाव गौरि येथे आयोजित करण्यात आले असून पंचक्रोशितिल मोठ्या संख्येने नागरिक व माता बंघिनिनी उपस्थित राहुन मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अवकाश पाटील धुपेकर यांनी केले आहे.
Leave a reply













