SR 24 NEWS

इतर

निळकंठेश्वर मठाच्या जगद्गुरूंच्या सानिध्यात, धार्मिक कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हा -गंगाधर महास्वामीजी

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी (चंद्रकांत हगलगुंडे) : वीरशैव धर्म हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा महात्मा बसवेश्वरच्या विचारांचा वारसा जोपासणारा धर्म असून शांतता- सद्भावना — व समाधानासाठी सर्वच जाती धर्मांना शांततेसाठी मानवधर्म व धर्माने विश्वाला शांती हा मूळ मंत्र असल्याची भावना श्री म.नि.प्र. गंगाधर महास्वामीजी यांनी व्यक्त केली. नीलकंठेश्वर संस्थान मठाच्या १३ ते २० मे पाच जगद्गुरूंच्या सानिध्यात होणाऱ्या अभूतपूर्व सोहळ्यास सर्वांनी तन- मन- धनाने सहभागी होण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष कल्याणी मुळे , बाबुराव मुळे , संतोष मुळे, धनराज मुळे, रामलिंग नरे, श्रीशैलं लंगडे, सोमनाथ डांगे उपस्थित होते.

श्री नीलकंठेश्वर संस्थान मठाच्या, नीलकंठेश्वर मठाचे मठाधिपती श्री प्रभुलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या जन्म शतक महोत्सव तसेच मठाधिपती वैराग्यमूर्ती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पट्टा भिशक महोत्सव, जन्मदिन सुवर्ण महोत्सव आदी धार्मिक कार्यक्रमासह श्रीमद जगद्गुरु पंचकधीश्वर यांच्या अडपालखी महोत्सवा शिव कथाकार पं. हरिहरानंद भारती स्वामीजी निमित्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, तेरा ते अठरा मे शिव कथा, 19 वीस मे म भव्य अड पालखी महोत्सव, 20 मे जगद्गुरूंच्या दिव्य सानिध्यात श्री गुरु शिवयोगी शिवाजी यांना हरिद्रा लेपन व अभ्यांग स्नान, धर्मसभा आधी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून महोत्सवाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकर चव्हाण उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!