तुळजापूर प्रतिनिधी (चंद्रकांत हागलगुडे) : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवार दि. ८ मे रोजी जाहीर झाला असून विद्यालयाने यंदाही उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यामध्ये
➡️ कु. भक्ती रामेश्वर कबाडे — 100 टक्के
➡️ कु. संस्कृती खंडू घोडके — 100 टक्के
या विद्यार्थिनींनी संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकावला.
तर,
➡️ कु. प्रतिक्षा दत्तात्रय धरणे — 98.40 टक्के मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला.
➡️ कु. शुभांगी शिवानंद लंगडे — 96.60 टक्के गुणांसह तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.
विद्यालयातून एकूण 387 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी
🔹 विशेष प्राविण्य — 120
🔹 प्रथम श्रेणी — 102
🔹 द्वितीय श्रेणी — 113
🔹 तृतीय श्रेणी — 24
असे एकूण 359 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 92.76 टक्के लागला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सचिव तथा अणदूर विद्यानगरीचे सरपंच मा. श्री. रामचंद्र दादा आलुरे, संस्थेचे मार्गदर्शक ॲड. मा. श्री. लक्ष्मीकांत पाटील, ॲड. श्री. नागनाथ कानडे तसेच मुख्याध्यापक श्री. गोपाळ कुलकर्णी यांनी विशेष अभिनंदन केले.
विद्यालयाच्या या उज्ज्वल निकालामुळे परिसरातून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Homeशिक्षण विषयीजवाहर विद्यालयाने जपली उज्वल यशाची परंपरा ; इयत्ता दहावीचा 92.76 टक्के निकाल विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
जवाहर विद्यालयाने जपली उज्वल यशाची परंपरा ; इयत्ता दहावीचा 92.76 टक्के निकाल विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

0Share
Leave a reply












