SR 24 NEWS

शिक्षण विषयी

विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीला शंभर टक्के निकाल

Spread the love

इंदापूर तालुका प्रतिनिधी (प्रविण वाघमोडे) : भिगवण येथील राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडीयम स्कूल, भिगवण येथील इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून शाळेने दरवर्षीप्रमाणे यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेमध्ये 

प्रणिती रघुनाथ आगवण हिने ९३.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. 

सानिका राहुल साखरे हिने ८८.०० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला तर 

सार्थक संतोष शेंडगे याने ८७.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

प्रतीक्षा बाळाचा सूर्यवंशी हिने ८६.६० टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे 

संस्कृती रामभाऊ पवार व श्रेया राजकुमार मुंगळे यांनी ८४.८० टक्के गुण मिळवत संयुक्त पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. विषयवार गुणवत्तेमध्येही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. प्रणिती आगवण हिने हिंदी, गणित व समाजशास्त्र या विषयांमध्ये १०० पैकी ९५ गुण मिळवून विशेष प्राविण्य संपादन केले. तसेच सानिका साखरे हिने विज्ञान विषयात १०० पैकी ९१ गुण मिळवून यश प्राप्त केले. या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व पालकांचे संस्थेचे अध्यक्ष बापूराव थोरात तसेच सचिव विजयभैय्या थोरात , शाळेच्या प्राचार्या वंदना थोरात यांनी हार्दिक अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!