SR 24 NEWS

इतर

माजी सैनिकांच्या एस.टी. प्रवास सवलती बाबत, परिवहन मंत्र्याकडे प्रस्ताव दाखल – शासन निर्णयाकडे लक्ष..!

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी (चंद्रकांत हगलगुंडे) : माजी सैनिकांना एसटी बस प्रवासात 50 टक्के भाडे सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई उपमहाव्यवस्थापक माधव कुशेकर यांना पाठवले असून ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठवल्याने माजी सैनिकात समाधान व्यक्त केले जात आहे. लवकरच शासन दरबारी न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केले जात आहे.

गेल्या दोन वर्षापासून माजी सैनिक एसटी सवलत प्रवास बाबत पाठ पुरावा करीत असून त्याला लवकरच यश मिळेल अशी आशा व्यक्त केले जात आहे. राप महामंडळाच्या बसेस मध्ये विशेष सामाजिक घटकांना प्रवास भाढे सवलत देण्यात येते. त्याचप्रमाणे देश सेवा केलेल्या माजी सैनिकांना प्रवास भाड्यात सवलत देण्याची मागनी प्रलंबित असून त्याला लवकरच यश मिळण्याचे अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या मागणीच्या पाठपुराव्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळाचे उपमहाव्यवस्थापक यांनी परिवार मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्याचे पत्र अड. सरदार घोपडे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माजी सैनिक सेल मुंबई यांना दिल्याचे माजी सैनिक, जिल्हा पोलीस सुरक्षा समिती सदस्य तथा सैनिक फेडरेशन शिवसेना सेल चे तुळजापूर तालुका उपाध्यक्ष संभाजी काळजाते यांनी पत्रकार द्वारे दिले आहे. त्यामुळे राज्यातील माजी सैनिकात समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे. शासन दरबारी या मागणीचा निश्चितच विचार केला जाईल असा विश्वास ही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!