SR 24 NEWS

राजकीय

नांदेडच्या श्री गुरु गोविंद सिंघ जी स्टेडियमच्या आधुनिकीकरणासाठी ४०० कोटींच्या प्रकल्पास मंजुरी द्या : खा. डॉ. अजित गोपछडे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी 

Spread the love

नांदेड प्रतिनिधी /धम्मदिप भद्रे  : नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंघ जी स्टेडियमच्या क्षमता विस्तार व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आधुनिकीकरणासाठी 400 कोटींचा निधी मंजूर करावा अशी मागणी खा. डॉ अजित गोपछडे यांनी केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेऊन केली आहे. 

 क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांना दिलेल्या निवेदनात खा. डॉ. अजित गोपछडे यांनी , नांदेड ही श्री गुरु गोविंद सिंघजींच्या पावन स्मृतींनी समृद्ध नगरी असून येथे क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी आधुनिक स्टेडियमची आवश्यकता आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या संस्कृतीक मंत्रालयाने ४० कोटी रु. च्या प्रस्तावास मान्यता दिली होती ते काम आता पूर्ण झाले असून नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेमार्फत स्टेडियमच्या आधुनिकीकरण व पुनर्बांधणीचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासोबतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्यासही मदत होणार आहे.

सुधारित प्रकल्प अहवालानुसार सुमारे ४०० कोटी रुपयांचा वाढीव खर्च अपेक्षित असून, यात मुख्य स्टेडियम इमारत, प्रेक्षक गॅलरी, क्रीडा सुविधा, आधुनिक प्रकाश व्यवस्था, सुरक्षा सुविधा, प्रशासकीय विभाग, पार्किंग तसेच इतर अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. हा निधी मंजूर झाल्यास स्टेडियमचे काम अत्याधुनिक पद्धतीने पूर्ण केले जाईल ज्यामुळे नांदेड जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राला मोठी भरभराटी येईल . शिवाय महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाचे खेळही या ठिकाणी खेळविले जातील. ज्यातून नांदेडचा आर्थिक विकास साधता येईल .असा विश्वास खा. डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!