SR 24 NEWS

राजकीय

मानोरी पोटनिवडणुकीतील विजयी सदस्यांचा सत्कार; ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक ठेवण्याचे आवाहन

Spread the love

मानोरी प्रतिनिधी  : मानोरी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या सत्कार समारंभात मा. मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगिता भागवत थोरात व अक्षय राजेंद्र पोटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळात ग्रामविकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी माजी उपसभापती रविंद्र आढाव, नवनाथ थोरात, ॲड. संजय पवार, पिरखाभाई पठाण, रावसाहेब चुळभरे, पोपट जाधव, अमोल पोटे, अमोल थोरात, वैभव पवार, आकाश पोटे, सागर थोरात, मनिषा थोरात, सविता गुंजाळ तसेच रावसाहेब साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थितांनी नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा देत ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक व जनतेच्या हिताचा ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. सत्कार समारंभामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!