अहिल्यानगर प्रतिनिधी (वसंत रांधवण) : अहिल्यानगर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून मुम्मका सुदर्शन यांनी आज दुपारी 3: 49 वाजता अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले सोमनाथ घार्गे यांची बदली करण्यात आली आहे. पदभार स्वीकारण्याच्या प्रसंगी जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यामध्ये अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, शिरीष वमणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचा समावेश होता.मुम्मका सुदर्शन यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Leave a reply












