SR 24 NEWS

जनरल

निवडणूक काळात 12 जणांना राहुरी तालुक्यात प्रवेशबंदी, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा कडक निर्णय

Spread the love

राहुरी  : राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील निवडणूक कालावधीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी या उद्देशाने 12 इसमांवर राहुरी तालुक्यात प्रवेशबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

हा आदेश दि. 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.00 वाजल्यापासून ते 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 08.00 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. सदर आदेश मा. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे यांनी जारी केला आहे.

प्रवेशबंदी घालण्यात आलेले इसम पुढीलप्रमाणे :

सोमनाथ रामदास गायकवाड (रा. कुरणवाडी)

गौरव राजेंद्र बाचकर (रा. नवीन गावठाण, बारागाव नांदूर)

गोरख अशोक बर्डे (रा. राहुरी खुर्द)

महेश भाऊसाहेब मंचरे (रा. गोटुंबे आखाडा)

संदीप दिलीप चेंडवाल (रा. गुंजाळे)

राहुल उर्फ पप्या गंगाधर कल्हापुरे (रा. देशवंडी)

पप्पू गुलाब बर्डे (रा. एकलव्य वसाहत, राहुरी)

करण भारत माळी (रा. एकलव्य वसाहत, राहुरी)

राकेश संजय माळी (रा. एकलव्य वसाहत, राहुरी)

अप्पासाहेब केशव वाडेकर (रा. वरशिंदे)

स्वप्नील रमेश बोरुडे (रा. राहुरी फॅक्टरी) आबासाहेब बाबासाहेब वरखेडे (रा. राहुरी फॅक्टरी) प्रशासनाच्या माहितीनुसार, संबंधित इसमांमुळे निवडणुकीदरम्यान शांततेत बाधा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांना आवाहन

राहुरी पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!