तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : सामाजिक क्षेत्रात विशेषता विविध उपक्रमात 8 फार्म ग्रुपचे काम स्तुत्य व प्रेरणादायी असल्याचे भावना नळदुर्ग नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे यांनी व्यक्त केले.भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सुनील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथे पाणपोई च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे हे होते.
सामाजिक क्षेत्रात असे उपक्रम राबवून सर्वसामान्यांना रखरखत्या उन्हात थंड पाण्याची व्यवस्था निश्चितच दिलासावह समाधानकारक असल्याची भावना स्तुत्य असून याचा मलाही अभिमान असल्याची भावना धरणे आप्पा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
यावेळी बोलताना 8 फार्मा ग्रुपचे सर्वेसर्वा अजय अणदूरकर यांनी सामाजिक बांधिलकी समजून हा ग्रुप विविध क्षेत्रात समर्पित भावनेने काम करीत असून एक वेगळा आदर्श जिल्ह्यात दिशा देणारा व पारदर्शक असल्यास सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात निस्वार्थ भावनेने काम करण्याचे काम हा ग्रुप करत असून त्याला समाजातून निश्चितच पाठवायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी नगरसेवक तानाजी जाधव, डॉ.जितेंद्र पाटील,रिझवान काझी, स्वप्नील काळे, नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे,आदी मान्यवर उपस्थित होते,
याच कार्यक्रमात नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाल्याबद्दल आरोही सातपुते या विद्यार्थिनीचा शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमास भय्या हजारी, अमर भाळे,पद्माकर घोडके, बबन चौधरी,पत्रकार उत्तम बणजगोळे, शिवाजी नाईक, दादा बनसोडे, उमेश जाधव, प्रमोद जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय जाधव, गोविंद शिंदे, अजय अणदूरकर, जीवन मोजगे, गुणवंत मुळे, राम जाधव आदीनी परिश्रम घेतले.
Leave a reply













