SR 24 NEWS

राजकीय

अमृतसर , काशीच्या धर्तीवर नांदेडला ‘होली सिटी’ करा : खा. डॉ. अजित गोपछडे यांची राज्यसभेत मागणी

Spread the love

नांदेड प्रतिनिधी/धम्मदिप भद्रे : शिख धर्मीयांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि गुरु गोविंद सिंघ जी यांच्या पावन पवित्र स्पर्शाने पुनीत झालेल्या नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी अमृतसर आणि काशीच्या धर्तीवर नांदेडला होली सिटी जाहीर करून विकास करावा अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी आज राज्यसभेत केली . राज्यसभेत शून्यकाळ दरम्यान त्यांनी महत्त्वपूर्ण आग्रही मागणी करत नांदेडला जागतिक कीर्तीचे तीर्थस्थळ करण्याचे अनुषंगाने निवेदन केले आहे. 

नांदेड हे शीख बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे. शिखांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंघ जी यांची पावन समाधी असून गुरुजींनी याच ठिकाणाहून बंदा सिंघ बहादुर यांना उत्तरेत मोहिमेसाठी पाठविले आणि इथेच ‘गुरु मानियो ग्रंथ’ ही ऐतिहासिक आज्ञा देऊन कायमस्वरूपी अकरावे गुरुंच्या स्वरूपात श्री गुरु ग्रंथ साहेब यांना याच धरतीवर विराजमान केले. हे असे सर्वार्थाने ऐतिहासिक पवित्र गोदावरी नदीच्या नाभी स्थानावर वसलेले शहर आहे. त्यामुळे नांदेडला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालेले आहे. अशा परिस्थितीत नांदेडचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील भाविक भक्तांसाठी स्थानिक घरेलू पर्यटकांसाठी मान्यवरांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी विकासाच्या व्यापक दृष्टिकोनातून नांदेड शहराला अमृतसर आणि काशीच्या धर्तीवर होली सिटी म्हणून घोषित करणे आवश्यक आहे. जेणेकरून या पवित्र नगरीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र वेगळी ओळख मिळेल असे स्पष्ट करत नांदेडचा सर्वांगीन विकास व्यापक दृष्टिकोनातून राज्यसभेत मांडला. नांदेडला एआय आणि आयटी हब म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव ही त्यांनी ठेवला.

नांदेड मधील आरोग्यसेवांना बळकटी देण्यासाठी एम्स सह सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची स्थापना करण्याची मागणी त्यांनी केली . नांदेडची वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी अमृतसर – हुजूर साहेब नांदेड दरम्यान स्लीपर वंदे भारत ट्रेन , नांदेड – पुणे आणि नांदेड- हैदराबाद मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी केली . शहराच्या अंतर्गत पायाभूत सुविधांसाठी त्यांनी मेगा फ्लाईओवर्स उभारण्याची मागणी केली. तरोडेकर चौक ते मुथा चौक , हिंगोली गेट ते वाजेगाव ( छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन ) यांच्या उभारणीची मागणी केली. शहराच्या शिस्तबद्ध विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करत रिंग रोड प्रकल्प वेगाने राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले   

खा. डॉ. गोपछडे यांनी नांदेडची स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने नांदेडमध्ये डिफेन्स ऑर्डिनन्स फॅक्टरी स्थापन करण्याची मागणी केली. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन स्थानिक युवकांना नवीन संधी उपलब्ध होतील असा प्रस्तावही त्यांनी सभागृहासमोर ठेवला. त्यावेळी नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांची तळमळ पुन्हा एकदा राज्यसभेत सिद्ध झाली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!