तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हागलगुंडे : सामाजिक काम, वैद्यकीय क्षेत्रातील योगदान, व सामाजिक बांधिलकी यांचा त्रिवेणी संगम म्हणजे पंचक्रोशीतील गोरगरीब जनतेच्या आरोग्याच्या हक्काचा माणूस डॉक्टर विवेक बिराजदार असल्याची भावना तुळजापूर पंचायत समितीचे मा. सभापती बालाजी मोकाशे यांनी व्यक्त केली.
भारतीय जनता पार्टीचे नेते तथा तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील मालक चव्हाण यांच्या जन्मदिनानिमित्त डॉ.बिराजदार यांनी जवळपास दोन लाखाची समाजोपयोगी होत असलेले कामे व जनतेची गरज ही सामाजिक भावना लाख मोलाची असून ही प्रेरणा सर्वसामान्यांना भूषणवह व प्रेरणादायी असल्याचे मत ही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
कोरोना काळातील त्यांचे योगदान, मधुकर चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तुळजापूरला जाणाऱ्या भक्तांची 24 तास सेवा, सर्वसामान्यांचे जननी 108, स्वतःच्या क्लिनिक मध्ये त्यांचे सेवा खरोखरच अचंबित करणारे असल्याचे त्यांनी यावेळी गौरव उद्गार काढले.
अणदूर येथील पावणारा गणपती आजोबा गणपतीस एलईडी टीव्ही, दोन्ही वडार वस्ती, खंडोबा मंदिर, दयावान चौक, मुल्ला वाडा सोसायटी, अण्णा चौक येथे लोखंडी बॅच आसन व्यवस्था, तुळजाभवानी कारखान्यावर डॉ. बाबासाहेबआंबेडकर जयंती साठी शेड. तसेच गावातील भजनी मंडळ पखवाज भेट देण्यात आला.
या विविध कार्यक्रमासाठी संगप्पा हगलगुंडे , विवेक मोकाशी, बाळासाहेब ढेपे, अविनाश मोकाशी, डॉक्टर मुंडे, आकाश जाधव, जाकीर शेख, विवेक घोटके, राजकुमार अलूरे, खंडू कापसे, मारुती बागडे, समीर मुकरे, प्रवीण सूर्यवंशी, प्रकाश बनसोडे, मच्छिंद्र चौगुले, दशरथ विटकर, सुरेश धोत्रे, किशोर बनपट्टे, संतोष ठाकूर गणेश सूर्यवंशी नाईकवाडे ,इनामदार सह मित्र परिवारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply













