SR 24 NEWS

सामाजिक

सुसंकल्प व सामाजिक संघटना तरवडी यांच्यावतीने संजय वैरागर यांना कला साहित्य भूषण पुरस्कार प्रदान

Spread the love

प्रतिनिधी मोहन शेगर सोनई : सुसंकल्प व सामाजिक संघटना तरवडी यांचे वतीने नुकताच संजय वैरागर यांना कला साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच सालबर्डी चित्रपटाचे यशस्वीरीत्या तिसऱ्या आठवड्यात पदार्पण झाल्याबद्दल वडाळा बहिरोबा येथे जाणता राजा ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे चेअरमन दिलीपराव मोटे यांनी वैरागर यांचा सन्मान केला.

   ग्रामीण भागातील कथा मराठी चित्रपट सृष्टीत चांगल्या प्रकारे उदयास येत असून मराठी चित्रपट सृष्टीला आता चांगले दिवस येत असून मराठी प्रेक्षक वर्ग आता सिनेमागृहाकडे जात असल्याने ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.कारण चित्रपट हा समाजाचा आरसा असल्याचे मोटे यांनी सांगितले

   संजय वैरागर यांनी सालबर्डी चित्रपटासाठी योग्य नियोजन आणि रमेश साहेबराव चौधरी यांचे दिग्दर्शन आणि मार्गदर्शन असल्यामुळे हा चित्रपट. प्रेक्षकाच्या पसंतीला उतरला असल्याचे त्यांनी सांगितले

या सत्कारप्रसंगी संजय वैरागर यांनी संस्थेचे आभार मानून या चित्रपटासाठी रमेश चौधरी आणि चित्रपटाचे निर्माते यांनी संधी दिल्यामुळे संधीचे सोने करता आले.या प्रसंगी संस्थेचे प्रभाकर डौले अजित ठोंबळ दत्तात्रय वैरागर आदी उपस्थित होते


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!