SR 24 NEWS

सामाजिक

प्रा.डॉ.सत्येंद्र राऊत यांना राज्यस्तरीय साहित्य विकासरत्न प्रेरणा पुरस्कार 

Spread the love

तुळजापूर (चंद्रकांत हागलगुंडे) : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर महाविद्यालयाचे सुप्रसिद्ध कवी व लेखक तसेच संस्कृत विभाग प्रमुख प्रा.डॉ. सत्येंद्र राऊत यांना दिनांक १९ एप्रिल अक्षय तृतीया रोजी कांदिवली मुंबई येथे समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट व्दारा साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राज्यस्तरीय साहित्य विकासरत्न प्रेरणा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

या प्रसंगी संस्थेच्या मिनाक्षी पाखरे, उद्घाटक अलका नाईक, अशोक मोहिते, रामकृष्ण कोळवणकर, रावसाहेब घोडेराव, मंगेश नाईक, संगीता वानखेडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा.राऊत यांची आजपर्यंत आसमंत काव्यप्रेमींचे, शिवकाव्य, अष्टाक्षरी, प्रेमकाव्य, निसर्ग काव्यसंग्रह असे नामांकित ग्रंथ प्रकाशित झाली आहेत तसेच हितोपदेश, संस्कृत सरिता, गीर्वाण मञ्जरी संस्कृत सुभाषिताञ्जली संपादित ग्रंथ छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बी ए च्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. अशी आतापर्यंत ९ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लवकरच विचारांचे महामेरु भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय काव्यसंग्रह, मैत्री राज्यस्तरीय काव्यसंग्रह तसेच प्रेरणादायी महिला गौरवगाथा हा विशेषांक प्रकाशित होणार आहे. यासोबतच काहीं मराठी गाणी युट्यूबवर प्रसारित होऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहेत.

अशाप्रकारे त्यांची साहित्यसेवा असून आजपर्यंत 50 पेक्षाही अधिक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित झाली आहेत. राज्यस्तरीय साहित्य विकासरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उमाकांत चनशेट्टी, संस्थेचे सचिव मा.रामचंद्र दादा आलुरे व बंधु श्री.महादेव राऊत, श्री.सोमनाथ खडके, आदर्श पत्रकार श्री. चंद्रकांत हगलगुंडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर बंधुभगिनी यांनी राऊत सरांचे यांचे अभिनंदन केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!