नांदेड प्रतिनिधी /धम्मदिप भद्रे : आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला असून राज्यसभेचे खासदार राघव चड्डा यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाच्या सहा खासदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे पंजाब व दिल्ली येथे पक्षाला बळ मिळाले असून आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत कमळ फुलण्याचे चिन्ह दिसत आहेत असा विश्वास भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
भाजपाचे नेते बालाजी बच्चेवार यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा व त्यांच्या सहा सहकारी खासदारांनी आम आदमी पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. चड्डा हे केवळ नेते नाहीत तर ते आम आदमी पक्षाचे अभ्यासू व हुशार नेते होते. भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केल्यामुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलण्याचे चिन्ह दिसत आहेत. दिल्लीत भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे. आता भाजपा दुप्पट ताकदीने उभी राहील, असा विश्वास भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त केला.
बच्चेवार यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राघव चड्डा यांच्यासारख्या तरुण, तडफदार व बुद्धिमान नेत्याला देशभरात काम करण्याची संधी मिळेल. त्यांच्या धोरणात्मक विचारांचा व प्रशासकीय कौशल्याचा थेट फायदा देशाला होणार आहे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ च्या संकल्पनेसाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरेल असे मत व्यक्त केले आहे.
खासदार राघव चड्डा यांचे पक्षात स्वागत करताना बच्चेवार म्हणाले की, आजचा दिवस भाजपा साठी ऐतिहासिक आहे. राघव चड्डा यांच्या रूपाने पक्षाला एक सशक्त आवाज मिळाला असे त्यांनी म्हटले आहे.
Leave a reply













