SR 24 NEWS

सामाजिक

साई सावली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या शासकीय आरोग्य योजनांचे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण 

Spread the love

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : आज धकाधकीच्या युगात बहुतेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विविध आजारांना निमंत्रण दिले जात आहे. असे अनेक आजार आहेत की ज्यावर सर्व सामान्य माणसाला महागडे उपचार घेणे परवडत नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने विविध आरोग्यदायी योजना सुरू केल्या आहेत. या सर्व योजना साई सावली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असून त्याच्या सर्वसामान्य माणसाला मोठा लाभ होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर येथील साई सावली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच विविध शासकीय आरोग्य योजना व हिमोफिलिया ट्रीटमेंट सेंटरचा लोकार्पण सोहळा मंत्री विखे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार काशिनाथ दाते हे होते. 

स्वागत व प्रास्तविक करताना साई सावलीचे चेअरमन डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी सर्व योजनांची माहिती दिली. परिसरातील कोणत्याही रूग्णाला आर्थिक अडचणीमुळे उपचार अडू नये हा आमचा प्रयत्न असतो. यावेळी जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सीताराम खिलारी, आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब बांडे, आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा प्रमुख डॉ. अनिकेत भालसिंग, विनायक देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, राहुल शिंदे, प्रशांत गायकवाड, माजी सरपंच शिवाजी खिलारी, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाबासाहेब खिलारी, अशोक फडके, विलास झावरे, नारायण झावरे, साई सावली चे उपाध्यक्ष डॉ. शौकत सय्यद, संचालक डॉ. स्वाती खिलारी , डॉ. संतोष ढवळे, डॉ. मुकेश ठुबे, डॉक्टर विजय पुरी, डॉक्टर जयवंत निमसे, डॉक्टर तुषार धुमाळ व परिसरातील सर्व गावांमधील विविध क्षेत्रातील पदाधिकारी व रुग्ण उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर भाऊसाहेब खिलारे यांनी केले व आभार प्रदर्शन भाऊसाहेब हिंगडे सरांनी केले. यानिमित्ताने ग्रामीण भागात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याने परिसरामधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!