SR 24 NEWS

इतर

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना आतंकवादी संबोधणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा जाहीर निषेध – बालाजी बच्चेवार 

Spread the love

नांदेड प्रतिनिधी/धम्मदिप भद्रे : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतंकवादी संबोधून केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा अवमान करणारी अशी भाषा लोकशाहीला काळिमा फासणारी आहे.  

जनतेने निवडून दिलेल्या पंतप्रधानांबद्दल असे हीन दर्जाचे शब्द वापरणे हे काँग्रेस पक्षाची विकृत मानसिकता दाखवते. देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या नेतृत्वाची अशा प्रकारे बदनामी करणे निंदनीय आहे.  खरगे यांनी तात्काळ देशाची माफी मागावी, अन्यथा जनताच त्यांना योग्य धडा शिकवेल. अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त केली


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!