नांदेड प्रतिनिधी / धम्मदीप भद्रे : खा. डॉ. अजित गोपछडे यांचे अंत्योदय कार्यालय हे केवळ त्यांच्या कार्यापुरते मर्यादित नसून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच लोककल्याणासाठी समर्पित आहे, असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार खा. अशोकराव चव्हाण यांनी काढले. डॉ. गोपछडे यांच्या वतीने दिवाळीनिमित्त आयोजित स्नेहभोजन सोहळ्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण, संघटन मंत्री संजय कौडगे, आमदार भिमराव केराम, आमदार राजेश पवार, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, माजी आमदार व महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, नरेंद्र चव्हाण, चैतन्य बापू देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सचिन पाटील उमरेकर, किशोर स्वामी, विजय येवनकर, मनोज भंडारी, लक्ष्मण ठक्करवाड, दत्ता कोकाटे, सदाशिव पुरी, शीतल खाडील, राज यादव यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेहभोजन सोहळ्याचे प्रास्ताविक करताना खा. डॉ. अजित गोपछडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे. सर्व घटकांचा समावेशक विकास हेच आमचे ध्येय असून नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण सर्वजण खा. अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील राहू.
पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले, “भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आता खऱ्या अर्थाने अच्छे दिवस लाभत आहेत.” आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकांवर भाजपा वर्चस्व निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, “जे कार्यकर्ते जनतेशी जोडले गेले आहेत, त्यांनाच पक्ष उमेदवारी देईल. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि कामगिरीतून स्थान निर्माण करा.” तसेच खा. डॉ. अजित गोपछडे यांनी आयोजित केलेला हा स्नेहभोजन कार्यक्रम सुसंवाद आणि मैत्रीपूर्ण संबंध दृढ करणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.
हा स्नेहभोजन सोहळा अत्यंत खेळीमेळीच्या, उत्साही आणि आनंदमय वातावरणात पार पडला.
खा. डॉ. अजित गोपछडे यांचे अंत्योदय कार्यालय लोककल्याणासाठी समर्पित — माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे गौरवोद्गार

0Share
Leave a reply












