अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सकाळी विद्यार्थी शिक्षक व संस्थेच्या प्रतिनिधी यांच्या समवेत गुरुपूजा संपन्न झाली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक डॉ जितेंद्र कानडे यांनी परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व गुरू परंपरा सांगणाऱ्या गुरु पूजेची महती सांगून विधीवत पूजा केली.
यावेळी बोलताना डॉ. कानडे म्हणाले की,गुरु हे एक फक्त व्यक्ती नसून गुरु हे तत्त्व ही आहे. हे तत्व प्रत्येक व्यक्तीमध्ये असून आपल्या प्रत्येकामध्ये एक गुरु वसलेला आहे. यासोबतच आई आपली पहिली गुरु आहे तर वडीलही आपले गुरु आहेत. आपल्या जीवनामध्ये चांगला मार्ग दाखवणारे प्रत्येक व्यक्ती ही आपला गुरु आहे.त्यामुळे आपल्या जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा उत्सव आहे. यानिमित्त आपण सर्वांनी आपल्या जीवनातील सर्व गुरूंना वंदन करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी.त्यांच्याविषयी धन्य असावे असे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांसह, शिक्षक, पालक यांनी सत्संग पूजा या मध्ये सहभाग घेतला.सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी लक्ष्मण नरे,शिवराज भुजबळ,अबाई कांबळे, मंजुषा मोरखंडीकर,अर्जुन माशाळकर, ज्ञानेश्वर बंडगर,सुरेखा काटे, कोमल बिराजदार, प्रियंका सूर्यवंशी,मयुरी कुलकर्णी,अर्जुन सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.
Leave a reply













