SR 24 NEWS

सामाजिक

अणदूर वडार समाज बांधवांच्यावतीने, राज्यातील नवनिर्वाचित सदस्य व समाजसेवकांचा सत्कार आयोजित..!

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी (चंद्रकांत हगलगुंडे) : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे वडार समाज बांधवांच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा तसेच नवनिर्वाचित सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.हा सन्मान सोहळा १ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता जवाहर महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास वडार समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक तथा उद्योजक लक्ष्मण चौगुले आणि मधुकर अण्णा बंदपट्टे यांनी केले आहे.

या सोहळ्यात राज्यातील वडार समाजातील नवनिर्वाचित सदस्य, विविध पदाधिकारी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, उच्चपदस्थ अधिकारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच अशा स्वरूपाचा एकत्रित सन्मान सोहळा आयोजित होत असल्याने समाजात उत्साहाचे वातावरण आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून विजय चौगुले, रामचंद्र आलूरे, शंकर चौगुले, प्रवीण घुगे, डॉ. जितेंद्र कानडे, रणवीर चव्हाण, ममित चौगुले, पिराजी मंजुळे, भरत विटकर, रवी शिंदे, सचिन कुपकर, सुधीर पवार, शंकर विटकर, राजेंद्र विटकर, सुनील जाधव, शिवाजी जाधव, तुकाराम चव्हाण, पंडित मंजुळे, रवींद्र शिंदे, दिलीप धोत्रे, अण्णासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राज्यात प्रथमच होत असलेल्या या भव्य सत्कार सोहळ्यास वडार समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!