ब्राम्हणी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील श्री क्षेत्र ब्राम्हणी गावातील पुरातन कालीन महादेव मंदिरात श्री नर्मदेश्वर शिवलिंगाची प्राणप्रिष्ठा व मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यास मंगळवार 24 फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहे. पहाटे 4 वाजता गंगाजल पूजन व मिरवणूक,दुपारी विधिवत पूजा व सायंकाळी 4 वाजता श्री नर्मदेश्वर शिवलिंगाची भव्य दिव्य मिरवणूक पार पडणार आहे.ब्राह्मणी गावचा मंगळवारचा आठवडे बाजार बुधवारी भरविण्यात येणार आहे.बुधवार 25 रोजी श्री नर्मदेश्वर शिवलिंगाची विविधत पूजा होईल.गुरुवार 26 रोजी सकाळी हभप सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा होईल.शुक्रवार 27 फेब्रुवारी रोजी एकादशीच्या पर्वदिनी सायं 7 ते 9 यावेळेत ॲड. शंकर महाराज शेवाळे यांचे जाहीर हरी किर्तन होईल.चार दिवसीय श्री नर्मदेश्वर शिवलिंग प्राणप्रतिष्ठा व मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यात सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे…असे आवाहन करण्यात येत आहे.
Leave a reply












