दिंडोरी प्रतिनिधी – जनता इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, दिंडोरी येथील उपशिक्षिका श्रीमती मंगला दामोदर बागुल यांनी श्रीलंकेतील कोलंबो येथील महिंदा राजपक्षे स्टेडियम, दियागामा येथे नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका इंटरनॅशनल ओपन मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये जबरदस्त कामगिरी करत एकूण चार पदकांची लक्षणीय कमाई केली आहे.
या स्पर्धेत त्यांनी खालीलप्रमाणे यश मिळवले:
🏅 ४०० मीटर शर्यत – सुवर्णपदक
🥈 ८०० मीटर शर्यत – रौप्यपदक
🥉 २०० मीटर शर्यत – कांस्यपदक
🥉 १००x४ रिले स्पर्धा – कांस्यपदक
एक शिक्षिका म्हणून शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले असून, त्यांच्या या अपूर्व यशामुळे दिंडोरीसह संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव झाला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल म.वि.प्र. समाज संस्था, तसेच अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यामध्ये अॅड. नितीन ठाकरे (सरचिटणीस), प्रवीण नाना जाधव (दिंडोरी-पेठ संचालक), प्रा. डॉ. भास्करराव ढोके (शिक्षणाधिकारी), प्राचार्य शेजवळ सर, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद, पालक, माजी विद्यार्थी व सहकाऱ्यांचा समावेश आहे.
याशिवाय, त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना मागील महिन्यात गरुड फाउंडेशनतर्फे “क्रीडाभूषण” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. श्रीमती बागुल यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
श्रीमती मंगला बागुल यांची श्रीलंका ओपन मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी, चार पदकांची कमाई ; महाराष्ट्राचा मान उंचावला

0Share
Leave a reply












