तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील आदर्श ग्राम खुदावाडी येथील शेतकरी वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 1 मार्च रोजी शेतकरी वाचनालय व जिल्हा ग्रंथालय महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय अधिवेशनाचे आयोजन केले असून यात ग्रंथालय प्रमुख व वाचकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजक डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांनी पत्रकार परिषदेत केले.धाराशिव जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात खुदावाडी येथे गेली शंभर वर्षांपासून शेतकरी वाचनालय असून या वाचनालयात शेकडो नागरिक व विद्यार्थी वाचन संस्कृती जोपासण्याचे व वृद्धिगत करण्याचे काम सातत्याने करीत आहेत.
यावेळी बोलताना डॉ. खजुरे म्हणाले की वाचन संस्कृतीवर प्रसार माध्यमांचा होणारा परिणाम या विषयावर परिसंवाद आयोजित केला असून या परिसंवादात भाग घेऊन अडचणी व समस्या यावर विचार विमर्श करण्यात येणार आहे.
वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ग्रंथालय चळवळ अधिक सक्षम होणे गरजेचे असून लहानपणापासूनच मुलांना वाचण्याची आवड निर्माण झाली पाहिजे ,यासाठी अधिवेशन असून वाचाल तर वाचाल ही काळाची गरज असून निव्वळ फोपावत चाललेल्या प्रसार माध्यमामुळे वाचनाची आवड आणि सवड कमी होत असल्याची खंत व्यक्त करून अशा अधिवेशनातून सकारात्मक विचार पुढे येतील आशा व्यक्त केली.एक मार्च रोजी सकाळी नऊ वाजता गावातून ग्रंथ दिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद आयोजला असून जिल्ह्यातील ग्रंथालय प्रमुख व वाचक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच्या आवाहन केले. या पत्रकार परिषदेत प्रा. वसंत चिंचोले ,सरपंच सरोजनी कबाडे, राजू पाटील, वसंत चिंचोले, तुकाराम बोंगरगे, महादेव सांगवे, पृथ्वीराज मुळे, सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त, खुदावाडी येथे 1 मार्च रोजी ग्रंथालय अधिवेशन..!

0Share
Leave a reply












