SR 24 NEWS

जनरल

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक : प्रारूप मतदार यादीवर ४ हजार ६०० हरकती दाखल

Spread the love

राहुरी प्रतिनिधी  : राहुरी विधानसभा मतदारसंघातील रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत १ जानेवारी २०२६ हा अर्हता दिनांक गृहीत धरून दिनांक ६ जानेवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.

या प्रारूप मतदार यादीवर मतदारांकडून मोठ्या प्रमाणावर हरकती व दावे दाखल करण्यात आले असून, एकूण ४ हजार ६०० हरकती प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या हरकतींमध्ये नाव वयात दुरुस्ती, नाव समावेश, वगळणे तसेच पत्ता बदल यासंबंधीच्या तक्रारींचा समावेश आहे.

प्राप्त झालेल्या सर्व हरकतींची नियमानुसार छाननी करून त्यावर निर्णय घेतला जाणार असून, अंतिम मतदार यादी निश्चित वेळापत्रकानुसार प्रसिद्ध केली जाणार आहे. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात असल्याचेही सांगण्यात आले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!