SR 24 NEWS

जनरल

आ.राणा दादा पाटील व सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – दीपक आलूरे

Spread the love

तुळजापूर  प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यात प्रतिष्ठेचे मानले जाणारे अणदूर जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात महायुतीच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत असून, केवळ विकास हाच ध्यास व संकल्प बाळगून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्यपदाचे उमेदवार दीपक दादा आलूरे यांनी केले. आमदार राणा दादा पाटील व सुनील चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अणदूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची स्पष्ट ग्वाही त्यांनी कार्यकर्ते व माध्यमांशी संवाद साधताना दिली. महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ शिक्षक कॉलनीतील गणेश मंदिरात करण्यात आला. सोसायटीचे माजी चेअरमन सिद्राम शेटे यांच्या हस्ते जिल्हा परिषद उमेदवार दीपक आलूरे व पंचायत समिती गणाचे उमेदवार रणवीर चव्हाण यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिसरातील असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीपक आलूरे पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत अणदूर परिसराचा चेहरामोहरा बदलला असून, आमदार राणा दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून विविध समाजोपयोगी विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत. येणाऱ्या काळातही विकासात्मक धोरण राबवून अणदूरचा कायापालट करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.महायुतीचे निवडणूक निरीक्षक दत्ता बंडगर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, देश, राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर सर्वांगीण विकासासाठी महायुतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नागरिकांनी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत ‘कमळ’ चिन्हावर मत देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सुनील चव्हाण, साहेबराव घुगे, दीपक दादा घोडके, बालाजी मोकाशे, संगप्पा हगलगुंडे, दयानंद मुडके, विक्रांत दुधाळकर, प्रवीण घोडके, सिद्धेश्वर मुळे, निलेश आलूरे, उमाकांत करपे, मनोज मुळे, गजानन मोकाशे, अनिल करपे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!