तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील धडाडीचे युवा पत्रकार नागेश करपे यांची अखिल भारतीय शिवा संघटनेच्या धाराशिव जिल्हा मीडिया प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लातूर जिल्ह्यातील कासार शिरसी येथे शिवा संघटनेच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या हस्ते निवडीचे अधिकृत पत्र देऊन नागेश करपे यांचा सन्मान करण्यात आला.
नागेश करपे यांच्या निवडीमुळे धाराशिव जिल्ह्यात शिवा संघटनेला अधिक बळ मिळणार असून, संघटनेच्या कार्याचा विस्तार होण्यास मदत होईल, तसेच लिंगायत समाजाच्या विविध अडचणी व समस्या प्रभावीपणे मांडून त्यावर मार्ग काढण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी वैजनाथ आपशेट्टी, शैलेश जकापुरे, वीरभद्र पिसे, कल्याण करपे, प्रवीण गुरव, गणेश नरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या निवडीबद्दल गुरुनाथ कबाडे, शिवशंकर तिरगुळे, चंद्रकांत हगलगुंडे, कैलास बोंगरगे, संजू आलूरे, सचिन तोग्गी, श्रीकांत अणदूरकर, शिवाजी कांबळे आदींनी नागेश करपे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Leave a reply













