राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राष्ट्रीय समाज पक्ष राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजित पाटील नेवासा व राहुरी तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.
महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवरती आले असून, राहुरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची नियोजन बैठक रविवार १३ जुलै रोजी राहुरी शहरात दुपारी ०३:०० वाजता राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली असून या बैठकीला जिल्हा संपर्क प्रमुख नानासाहेब जुंधारे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार खेमनर, ज्येष्ठ नेते सुनिल चिंदे, कलावंत व वारकरी आघाडी जिल्हाध्यक्ष गोरखनाथ येळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजक तालुकाध्यक्ष शिवाजी खेडेकर यांनी दिली.
राहुरी तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करत असताना जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण व नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायती निरीक्षकांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून या प्रसंगाने तालुका बांधणी करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली.
Leave a reply













