SR 24 NEWS

जनरल

राहुरी पोलिसांची गावठी हातभट्टीवर कारवाई; वांबोरी परिसरात अवैध दारूसाठा जप्त

Spread the love

वांबोरी प्रतिनिधी /  ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात बेकायदा गावठी दारूची विक्री करणाऱ्या एका इसमावर राहुरी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गावठी हातभट्टीची दारू जप्त करून एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दि. ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास वांबोरी बाजारतळ परिसरातील एका टपरीच्या आडोशाला अवैध दारूची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती राहुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील भानुदास निकम व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी म्हसु शेरीबा फुलारी (वय ६० वर्षे, रा. वांबोरी) याला ताब्यात घेतले. आरोपीकडून प्लास्टिकच्या ड्रममध्ये साठवून ठेवलेली सुमारे १५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली असून, तिची अंदाजे किंमत ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ११४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार बबन राठोड करीत आहेत.vदरम्यान, बेकायदा दारू विक्रीविरोधात पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केल्याने अवैध व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!