राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे सरपण काढण्यासाठी शेतात गेलेल्या ८५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला जुन्या वादातून लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिमाजी तबाजी तमनर (वय ८५) असे जखमी वृद्धाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिमाजी तमनर हे आपल्या शेतात सरपण काढत असताना आरोपींनी तेथे येऊन जुना वाद उकरून काढत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लाकडी दांडक्याने मारले. यावेळी आरोपींनी जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात कैलास तमनर, विलास तमनर, जिजाबाई तमनर व मंदाबाई तमनर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५१(२) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन दारकुंडे हे करीत आहेत.
तमनर आखाडा येथे सरपण काढण्यासाठी गेलेल्या ८५ वर्षीय वृद्धावर लाकडी दांडक्याने हल्ला ; चौघांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हादाखल

0Share
Leave a reply












