SR 24 NEWS

क्राईम

राहुरीत बेकायदा हातभट्टी दारूवर पोलिसांचा छापा ; महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी परिसरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, मुलनमाथा परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गावठी हातभट्टी दारू विक्रीवर राहुरी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मुद्देमालासह एका महिला आरोपीला ताब्यात घेतले असून तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल योगेश छगन आठरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सोमवार, दि. १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मुलनमाथा, राहुरी बुद्रुक येथील एका घराच्या आडोशाला बेकायदा दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता, मिना सुभाष गुंजाळ (वय ३४, रा. मुलनमाथा, राहुरी बु.) ही महिला विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगताना मिळून आली.

या कारवाईत पोलिसांनी सुमारे १५०० रुपये किमतीची १५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. ही दारू एका प्लास्टिक ड्रममध्ये उग्र वासाची व तयार स्वरूपात होती.याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर २३८/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संदीप ठाणगे हे करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!