मानोरी (सोमनाथ वाघ) : कारखान्याचे चेअरमन आदरणीय अरुण साहेब तनपुरे यांचा डिग्रस सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम मार्केट कमिटीच्या कार्यालयात, नव्याने निवडून आलेले चेअरमन प्रकाश तारडे सर यांच्या अध्यक्षतेखाली, सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.
सत्कारप्रसंगी अरुण साहेब तनपुरे यांनी डिग्रस सोसायटीच्या कार्यपद्धतीबाबत, पारदर्शकता, आर्थिक शिस्त, भविष्यातील योजनांविषयी व शेतीपूरक उपक्रमांविषयी नव्या नेतृत्वाला मार्गदर्शन केले. त्यांनी चेअरमन प्रकाश तारडे यांचे विशेष अभिनंदन करत सांगितले की, “सोसायटी हे गावाच्या विकासाचे प्रभावी साधन असून सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे.”
या कार्यक्रमादरम्यान सचिव नवनाथ मंडलिक यांनी सोसायटीच्या आर्थिक स्थितीची सविस्तर माहिती अरुण साहेब तनपुरे यांना दिली. आर्थिक शिस्त आणि पारदर्शक व्यवहार यावर भर देत सचिवांनी सद्यस्थितीत सोसायटी कशी स्थिर आहे, याचे स्पष्टीकरण दिले.
कार्यक्रमाला प्रवीण भिंगारदे, ग्रामविकास अधिकारी भारत जाधव, सचिन भिंगारदे, ग्रामसेवक जालिंदर बेलेकर, सचिव साईनाथ बेलेकर, संचालक शामसुंदर भिंगारदे, संचालक राजेंद्र भिंगारदे, पत्रकार दत्तात्रय तोडमल आणि ग्रामपंचायत लिपिक बापूसाहेब गिरगुणे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा सत्कार सोहळा निवडक पदाधिकारी आणि सन्माननीय व्यक्तींच्या उपस्थितीत अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे चेअरमन अरुण साहेब तनपुरे यांचा डिग्रस सोसायटीच्यावतीने सत्कार

0Share
Leave a reply












