SR 24 NEWS

राजकीय

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खा. डॉ. अजित गोपछडेकडून 20 लाखांची मदत, घाबरू नका सरकार आपल्या पाठीशी असल्याचा दिला विश्वास 

Spread the love

नांदेड प्रतिनिधी / धम्मदीप भद्रे  : मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद सह परिसरातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला होता. येथे जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे त्यामुळे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी आज हसनाळ, रावणगाव या पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी खासदार निधीतून वीस लाख रुपये जाहीर केले. शिवाय राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडूनही आपण मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास खा. डॉ. गोपछडे यांनी यावेळी दिला आहे. 

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील हसनाळ , रावणगाव आदी गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. अतिवृष्टीने पाच जणांचे बळी घेतले तर शेकडो पशु ही मृत्युमुखी पडले आहेत .लाखो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला होता . असा परिस्थिती पूरग्रस्तांना धीर देण्यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे हे दिल्लीवरून थेट रावणगाव , हसनाळ येथे पोहचले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. गावातील घरांची झालेली पडझड समजून घेतली आणि वीस लाख रुपयांची मदत जाहीर केली. शिवाय

  पंतप्रधान नरेंद्र मोदी , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आणि पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे नागरिकांनी धीर सोडू नये. या नैसर्गिक संकटातून आपल्याला सावरण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असे सांगत खा. डॉ. अजित गोपछडे यांनी पूरग्रस्तांना धीर दिला .दरम्यान आपल्या खासदार निधीतून पूरग्रस्तांसाठी संसार उपयोगी साहित्य पुरवठा करण्यात येणार असून यात गॅस सिलेंडर आणि स्वयंपाक उपयोगी भांडी यांचा समावेश असणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

 यावेळी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, तहसीलदार राजेश जाधव , शादुल पटेल , राजू पाटील रावणगावकर , राम पाटील भाटापूरकार , शिवराम आप्पा हसनाळे ,प्रदीप पाटील, तुकाराम सुडके ,बालाजी ढोसणे , त्र्यंबक पाटील यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती .


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!