राहुरी प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सुरशे : भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एएलआयएमसीओ) कानपूर, एस.आर. ट्रस्ट (मध्यप्रदेश), डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने एडीप योजना अंतर्गत राहुरी येथे मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन कन्या शाळा, राहुरी येथे शिबिर पार पडले. या शिबिरात एकूण 63 अस्थिव्यंग लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, यामधून निवडलेल्या 46 लाभार्थ्यांना कृत्रिम पाय (कॅलिपर्स) वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रशांत गायकवाड (जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी), डॉ. अभिजीत दिवटे (संचालक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र), श्री. एस.एस. चुमले (एएलआयएमसीओ), डॉ. रुपेश जाधव (संचालक, एस.आर. ट्रस्ट), डॉ. दीपक आनाप, डॉ. अभिजीत मिरेकर (प्रकल्प समन्वयक), गटशिक्षण अधिकारी कुंभारे साहेब, मधुकर घाडगे (संस्थापक अध्यक्ष, दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी व जिल्हाध्यक्ष, प्रहार दिव्यांग संघटना उत्तर अहिल्यानगर), सलीम शेख (जिल्हा सल्लागार), योगेश लबडे (तालुका अध्यक्ष), जुबेर मुसानी (शहराध्यक्ष), तसेच श्री. संतोष साळवे, प्रवीण कांबळे, नशीर देशमुख (तालुका समन्वयक), सुनंदा घुले मॅडम (मुख्याध्यापिका, साई सेवा निवासी मतिमंद विद्यालय शिर्डी) यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख मनोज भापकर यांनी केले.
Leave a reply














