SR 24 NEWS

जनरल

अहिल्यानगर – कल्याण राष्ट्रीय महामार्ग बनता बनता बनला मृत्यूचा सापळा ! पुण्याच्या `टी अँड टी’ कंपनीवर कारवाई करा – बाळासाहेब खिलारी

Spread the love

अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : अहिल्यानगर – कल्याण राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक २२२) हा महामार्ग डांबरीकरणाऐवजी आता सिमेंट काॅंक्रीटचा केला जात आहे. महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील अहिल्यानगर ते टाकळी ढोकेश्वर – पारनेर तालुका हद्द या ५० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाला गेल्या महिन्यापासून वेगाने बनत असताना मृत्यूचा सापळा बनला आहे. ठेकेदाराच्या चुकीच्या धोरणामुळे दररोज मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे दररोज अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. प्राप्त माहितीनुसार पारनेर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये आतापर्यंत १२ जणांनी जीव गमावला असून २५ ते ३० जण अपघातत जखमी झाले आहेत. खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी जबाबदार असणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत खासदार निलेश लंके यांनीसुद्धा या रस्त्याच्या कामासंदर्भात नाराजी व्यक्त केली असून अपघातांचे प्रमाण वाढले असल्याकारणाने ते सुद्धा उद्या सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे उपोषण किंवा आंदोलनाच्या तयारीत असल्याचे सुत्रांनी सांगितले. मुळात चांगल्या स्थितीत असलेल्या या रस्त्याला रस्त्याला दुरुस्तीची गरजच का? भासली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण असल्याचे अनेक प्रवाशांचे म्हणणे आहे. रस्त्याचे काम होत असताना वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. वाहानांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. ज्या साईड पट्ट्याचे काम सुरू आहे. तेथून पर्यायी वाहतूक व्यवस्था करून देणे ही कंपनीची जबाबदारी असते, मात्र रात्र असो की दिवस कंपनीचे कर्मचारी हायवेवर दिसत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहे.

अधिकृत मिळालेल्या माहितीनुसार चुकीच्या दिशा फलकामुळे तसेच चुकीचे डिव्हायडर दिल्यामुळे तसेच चूकीचे गतीरोधक दिल्यामुळे अपघात होऊन एक महिनाभरात १२ ते१५ जणांना आपला जीव यामध्ये गमावला लागला आहे. काम पूर्ण झालेल्या रस्त्याच्या बाजूला टोकदार लोखंडी गज आडवे लावलेले असून, काही ठिकाणी अरुंद पुल, दुसऱ्या बाजूला खोल गटारे आणि अरुंद रस्ता, सिमेंट काॅंक्रीटीरण करत असताना त्यामध्ये वापरले जाणारे मटेरियल निकृष्ट दर्जाचे आहे. याचे प्ररिक्षण हायवेच्या अधिकृत इंजिनिअर लोकांनी करावे असे देखील सर्वसामान्य प्रवाशांची करत आहेत. नियमानुसार सहा किलोमीटर अंतरामध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हे ठेकेदाराचे काय आहे. मात्र,२० ते २५ किलोमीटर एकसाईड वाहतूक सुरू असल्याने एकाच पट्ट्यावर वाहनांची वाहतूक सुरू असल्याने प्रचंड गर्दी होते आहे. भाळवणी, ढवळपूरी फाटा ते वाघ वाडी फाटा, धोत्रे, ढोकी फाटा,तिखोल फाटा, टाकळी ढोकेश्वर बायपास रोड या ठिकाणी दररोज वाहातूक कोंडी होते त्यामुळे अहमदनगर शहत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड हाल होत आहेत. 

महामार्ग पोलिस व स्थानिक पारनेर व टाकळी ढोकेश्वर पोलीसांनी यासंदर्भात कंपनीवर कोणतीही ठोस कारवाई केली नाहीतर लोकशाहीच्या माध्यमातून कंपनी विरोधात आंदोलनाचा इशारा खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी दिलेल्या प्रसिद्धीस पत्रकात म्हटले आहे. 

पुण्याच्या `टी अँड टी’ कंपनीवर कारवाई करू – बाळासाहेब खिलारी 

या रस्त्याच्या निर्मितीसाठी पुण्याच्या `टी अँड टी’ या कंपनीला जबाबदारी देण्यात आली आहे. या महामार्गासाठी केंद्र सरकारच्या वतीने २५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ह्या सिमेंट काॅंक्रीटीचा रस्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मदतीने सुरू आहे. सद काॅंक्रीटीकरणाची दुसरी लेण सुरू असून,पहिली लेण ही दुसऱ्या दिशेने जाणाऱ्या वाहनांकरता अपूर्ण पडत आहे. एका बाजूने फक्त चार फूटाचा डांबरी रस्ता उरलेला असून सहा फूटाचा रोड मूरुम मातीचा आहे. ज्यावेळी त्यावर गाड्या जातात त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या वाहनांना प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सिमेंट काॅंक्रीटीकरण झालेल्या सिमेंट मध्ये काही गज आडवे लावलेले असून ते गज रात्री मोटार सायकल स्वारांच्या पायाला लागत असून ते जखमी होत आहेत. तसेच काही वाहानांच्या टायरचे सुद्धा प्रचंड नुकसान होत आहे. राष्ट्रीय महामार्ग ६१ यांनी त्वरित यामध्ये लक्ष घालून त्या ठिकाणी चांगला रस्ता बनवावा अशी मागणी होत आहे. तसेच सिमेंट काॅंक्रीटीकरण झालेल्या रस्त्यावर चांगले रिफ्लेक्टर व रात्रीच्या वेळी वाहनांना दिसेल असे रेडियम लावण्याची मागणी वाहन धारक प्रवाशी करत आहेत. सदर रस्त्यामध्ये साईड पट्ट्याच्या कामामध्ये जो मुरुम वापरण्यात येणार आहे त्या ठिकाणी तो दररोज वापर व्हावा अशी मागणी होत आहे. 

पारनेर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये आतापर्यंत १० ते १५ अपघात होऊन हजारो लोकांचे संसार प्रपंच यामध्ये उध्वस्त झाले आहेत. 

मोठ्या थाटात वसूल केला जाणारा टोल यामुळे वाहतूक करणारे प्रवासी वैतागून गेले आहे. अपघात होणे म्हणजे जणू नित्याचाच दिनक्रम बनला आहे. याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप होत आहे. खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, संबंधित पुण्याच्या टी अँड टी कंपनीचा ठेकेदार आणि हायवे प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!