SR 24 NEWS

क्राईम

अवैध दारू वाहतूक करणारे दोन जण गोटुंबे आखाडा परिसरातुन राहुरी पोलिसांच्या ताब्यात ; रु.८७,६८०/- किमतीचा मुद्देमाल जप्त

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दि.१० जुलै २०२४ – राहुरी शहरात अवैधरीत्या वाहनातून दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण ₹८७,६८०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक १० जुलै २०२४ रोजी सकाळी पोलिस निरीक्षक श्री. संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, राहुरी शहरातून अवैधरित्या मोटारसायकलद्वारे दारूची वाहतूक केली जात आहे. त्यांनी तात्काळ पथक तयार करून तपासाची जबाबदारी सोपवली. पथकाने गोटुंबे आखाडा परिसरात सापळा रचत कार्यवाही केली असता, होंडा शाईन मोटरसायकल (क्र. MH17 CC 7566) वर दारूची चोरटी वाहतूक करताना दोघांना ताब्यात घेतले.

आरोपींची नावे पुढीलप्रमाणे – 1) आकाश भाऊसाहेब लेकुळे (वय २५, रा. शनी चौक, राहुरी)  2) सुनील विठ्ठल जगधने (रा. देशवंडी, ता. राहुरी) त्यांच्याकडून ₹७,६८०/- किमतीची देशी दारू आणि ₹८०,०००/- किमतीची होंडा शाईन मोटरसायकल असा एकूण ₹८७,६८०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. श्री. सोमनाथ घारगे (पोलीस अधीक्षक, अहमदनगर), मा. श्री. वैभव कलुबर्मे (अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर), व डॉ. बसवराज शिवपुजे (उपविभागीय पोलिस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय आर. ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोहेकॉ. अर्जुन दारकुंडे, पोहेकॉ. सतीश आवारे, पो.ना. गणेश सानप, पो.कॉ. भाऊसाहेब शिरसाट, व पो.ह. शकूर सय्यद (राहुरी पोलिस स्टेशन) यांनी सक्रिय सहभाग घेतला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!