राहुरी प्रतिनिधी / आर. आर. जाधव : भारतीय जनता पार्टीच्या नुकत्याच झालेल्या पदाधिकारी निवडीच्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी राज्य परिषदेवर सुभाषराव गायकवाड यांची 2025 ते 2028 या कालावधी करिता नुकतीच निवड झाली आहे. मुख्यमंत्री मा. ना. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह प्रदेश स्तरावरील वरिष्ठ पदाधिकारी या परिषदेवर कार्यरत आहेत.गेली अठ्ठाविस वर्ष भाजपाच्या जिल्हा व प्रदेश स्तरावरच्या विविध जबाबदाऱ्या गायकवाड यांनी यशस्वी पणे पार पाडल्या आहेत.रा. स्व. संघ. अ भा वि प, सामाजिक समरसता मंच. आदी. संघटनेच्या जबाबदाऱ्या देखील त्यांनी महाविद्यालीन जीवनात सांभाळालेल्या आहेत.भाजपाच्या सुरवातीच्या काळापासून ते काम करतात.ग्रामपंचायत निवडणुकी पासुन ते लोकसभेच्या अनेक निवडणूकींचे व्यवस्थापन करण्याचा त्यांचा अनुभव आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांची राज्य परिषदेवर निवड केली असुन या निवडीबद्दल जिल्ह्याचे पालक मंत्री ना श्री राधाकृष्णा विखे पाटील. विधानपरिषद अध्यक्ष ना. प्रा. श्री रामजी शिंदे साहेब. माजी मंत्री आमदार श्री शिवाजीराव कर्डीले साहेब. अहिल्यनगर दक्षिणचे भाजपा अध्यक्ष मा श्री दिलीपराव भालसिंग. तसेच जिल्हा व प्रदेश स्तरावरील अनेक पदाधिकारी त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘
Leave a reply














