विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे आज गुरुवार १० जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रामदास भाऊसाहेब बांडे शिष्य मंडळ आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव २०२५ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी लोकनेते खासदार मा.निलेशजी लंके,आमदार मा. काशिनाथ दाते सर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. सुजितराव झावरे पा., जिल्हा मराठा प्रसारक समाज संस्थेचे जेष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी सर,अशोकशेठ कटारिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.
या शिष्यगण मेळाव्यासाठी गुरुवार दि.१० जुलै रोजी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत ह.भ.प. गोरक्षनाथ महाराज रोकडे (वडगाव सावताळ) यांचे सुश्राव्य प्रवचन होईल सकाळी ११ वाजता सर्व गरजवंतांना वस्त्र वाटप होणार असून सकाळी ११ ते ५ वा. या वेळेमध्ये अशोक गंगाराम चव्हाण,महेश धोडीराम सर्वश, महेश रामदास बांडे यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजनही या ठिकाणी करण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन टाकळी ढोकेश्वर सरपंच, उपसरपंच, चेअरमन व्हा. चेअरमन, सर्व पत्रकार बांधव, भैरवनाथ मित्र मंडळ, बनाई मित्र मंडळ, नवभारत मित्र मंडळ, समस्त ग्रामस्थ टाकळी ढोकेश्वर व सर्व शिष्यगण परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
आज टाकळीढोकेश्वर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त शिष्यगण मेळाव्याचे आयोजन, खासदार निलेश लंके, आमदार काशिनाथ दाते, सुजित झावरे यांची प्रमुख उपस्थिती

0Share
Leave a reply












