विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे यांच्या राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत शाश्वत विकास सुप्रशासनयुक्त गाव प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या दरम्यान पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर या आदर्श गावी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा पाच दिवसांच्या निवासी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने भेट दिली. अभ्यास दौऱ्यात यशदा संस्थेचे व राज्यातील ६ प्रशिक्षणार्थी अधिकारी सहभागी झाले होते.
अधिकाऱ्यांनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बचतगट, ग्रामीण रुग्णालय, श्री. ढोकेश्वर विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, तलाठी कार्यालय, स्वस्त धान्य दुकान, अंगणवाडी, कृषी विभाग कार्यालय, देवस्थान आदी विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहाणी करून माहिती घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांबाबत तसेच शाळेच्या शिक्षिकांचे व विद्यार्थ्यांचे देखील कौतुक केले. पिण्याचे पाणी, घनकचरा, सांडपाणी यांचे व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते, आरोग्य सुविधा, वृक्षारोपण व संवर्धन, आम्ही टाकळी जलशुद्धीकरण प्रकल्प अन्य विविध विकासकामे, तसेच ग्रामपंचायतीचे
दैनंदिन कामकाज याबाबतची माहिती सरपंच अरुणा खिलारी व ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब दावभट यांनी अधिकाऱ्यांना दिली. सरपंच अरुणा खिलारी यांचेकडून महिला बचत गट व ग्रामसंघ यांच्या कार्याची माहिती घेण्यात आली. ग्रामपंचायतीचे संगणीकरण व ऑनलाइन कामाची माहिती लिपिक लखन आल्हाट यांनी दिली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पक्षी उद्यान, औषधी वनस्पती उद्यान, परसबाग, ग्रंथालय, मध्यान्ह भोजन कक्ष, बालोद्यान वापराविषयीची माहिती मुख्याध्यापक ठुबे यांच्याकडून घेतली. तालुक्याच्या उत्तरेकडील गाव, त्यात प्रतिकूल परिस्थिती असूनही केवळ शैक्षणिक क्षेत्रातील गावाचे नाव देशाच्या नकाशावर झळकत आहे. अशा प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती शीतल घोलप (उपजिल्हाधिकारी), श्रीमती रुपा मोहितकर ( बाल विकास प्रकल्प अधिकारी), सागर वाघमारे ( तहसीलदार), गौरव बंग ( सहाय्यक राज्य कर आयुक्त), अनिल काळे (सहाय्यक राज्य कर आयुक्त),प्रेरक उजगरे (शिक्षणधिकारी) व ग्रामस्थ उपस्थित होते.
टाकळीढोकेश्वर येथे प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा, प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांकडून टाकळी ढोकेश्वरचे कौतुक

0Share
Leave a reply












