SR 24 NEWS

सामाजिक

झाडाचा वाढदिवस साजरा करणारे एक अवलिया व्यक्तिमत्त्व — प्रा. चांगदेव गायकवाड सर

Spread the love

वाढदिवस विशेष : जीवन म्हणजे एक वनवा — कुणीतरी पेटवलेला, कुठे तरी पेटलेला, आणि कधीतरी आकस्मात विझणारा…प्रत्येक जण आपापल्या सुखासाठी झगडताना दिसतो; मात्र काही माणसं अशी असतात की, आपलं सुख कुटुंबाच्या, सहकाऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या आनंदात शोधतात.

अशा थोडक्याच व्यक्तींपैकी एक म्हणजे प्रभात मंडळाचे हरहुन्नरी, चतुरस्त्र, कॅमेऱ्याच्या एका क्लिकमध्ये क्षणांचे मौल्यवान चित्ररूप जपणारे – प्रा. चांगदेव गायकवाड सर!सरांचं झाडांवरील प्रेम म्हणजे केवळ शोभेची गोष्ट नाही. उन्हाच्या तप्त झळांमध्येही झाडांची काळजी घेणं, पाणी घालणं आणि त्यांच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करणं, हे त्यांच्या जीवनविषयक दृष्टीकोनाचे सुंदर प्रतीक आहे. ते केवळ शिक्षक नव्हते – ते विद्यार्थ्यांचे शिल्पकार, मार्गदर्शक, जीवनाच्या वाटेवरचा प्रकाशवाटा दाखवणारा दीपस्तंभ होते. जवाहर विद्यालयाचे माजी शिक्षक म्हणून त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवले.

आज गुरुपौर्णिमेच्या शुभक्षणी, आम्ही आदरणीय नवनाथ संघशेट्टी गुरुजी आणि प्रा. चांगदेव गायकवाड सर यांना शतशः नमन करतो. गुरु हेच आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात – हेच त्यांचं अमरत्व!
आज संघशेट्टी गुरुजींचे चिरंजीव जयप्रकाश सर यांनी अणदूरचं नाव सात समुद्रापार पोहोचवलं – याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.

आपल्या दोन्ही गुरूजनांना गुरुपौर्णिमा आणि वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिवादन!

शुभेच्छुक
जय मल्हार पत्रकार संघ व चंद्रकांत हगलगुंडे परिवार, अणदूर


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!