पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : धनगर समाज संघर्ष समितीच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी मा. किरण अंबादास कारंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पद्मश्री मा. खासदार डॉ. विकास महात्मे (राष्ट्रीय अध्यक्ष), प्रदेशाध्यक्ष अनंत बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष पांडुरंग दातीर तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष पोपटराव महारनवर यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीसोबतच समितीच्या अन्य काही पदांवरही जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मा. सुनील सावळीराम खरात यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, मा. श्रीमती सुदर्शन जानू गरदाडे यांची महिला जिल्हा उपाध्यक्षपदी तर मा. अक्षय राजाराम पिसे यांची अहिल्यानगर शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे संपूर्ण समाजातून अभिनंदन होत आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यस्मरणदिनी झालेल्या या नियुक्त्या अत्यंत प्रतीकात्मक व प्रेरणादायी ठरत आहेत. या नियुक्तीद्वारे समाजकार्याला नवी दिशा व ऊर्जा प्राप्त होईल, असा विश्वास अनेक मान्यवरांनी व्यक्त केला आहे.
Leave a reply













