राहुरी (प्रतिनिधी) : राहुरी तालुक्यातील वडनेर येथील ज्येष्ठ नागरिक कै. विठ्ठल गंगाधर बलमे (बापू) वय ६० यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
कै. बलमे हे प्रकाश विठ्ठल बलमे यांचे वडील तर रमेश तमनर व गोविंद यशवंत तमनर यांचे सासरे होत. त्यांचा अंत्यविधी शनिवार, सकाळी नऊ वाजता वडनेर येथील अमरधाम येथे पार पडणार आहे.
त्यांच्या निधनाने वडनेर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Leave a reply













