राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी तालुक्यातील गोंटुंबे आखाडा येथे “तु शिवीगाळ करू नको” असे म्हणण्याचे धाडस केल्याने एका वयोवृद्ध महिलेला निर्दयी मारहाणीचा सामना करावा लागला. दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी घडलेल्या या प्रकाराने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिजाबाई किसन दाभाडे (वय ६०, व्यवसाय – घरकाम व मजुरी, रा. गोंटुंबे आखाडा) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या घराशेजारी दादाराव भिकाजी बनकर आपल्या कुटुंबासह राहतो. घटनेच्या दिवशी सायंकाळी सुमारे पाच वाजता विकास दादाराव बनकर हा त्यांच्या घरासमोर आला आणि कोणतेही कारण नसताना अश्लील शिवीगाळ करू लागला. तेव्हा जिजाबाई दाभाडे यांनी शांततेने त्याला “तु शिवीगाळ करू नको, तु तुझ्या घरी जा,” असे सांगितले. एवढ्याच कारणावरून विकास बनकर संतापला आणि जिजाबाई यांच्यासह त्यांची मुले राजु दाभाडे व संदीप दाभाडे यांना लाकडी काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी जिजाबाई दाभाडे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात विकास दादाराव बनकर, त्यांची पत्नी, कांता दादाराव बनकर, दादाराव भिकाजी बनकर आणि बाबासाहेब दादाराव बनकर (सर्व रा. गोंटुंबे आखाडा, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक ११४३/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९०, १९१(३), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ए. एम. दारकुंडे करत आहे.
गोंटुंबे आखाडा येथे वयोवृद्ध महिलेला मारहाण, “शिवीगाळ करू नको” म्हटल्याचा राग आल्याने मारहाण

0Share
Leave a reply












