अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय वातावरण तापणार आहे. भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय, राहुरी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्यानंतर पांडुरंग मंगल कार्यालय येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या शक्तीप्रदर्शनाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही मंचावर हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या सभेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजपकडून अक्षय कर्डिले यांना राहुरी मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने आज मोठा जनसागर उसळण्याची शक्यता आहे. अक्षय कर्डिले यांनी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ही फक्त अर्ज भरण्याची प्रक्रिया नाही, तर विजयाची सुरुवात आहे, असा ठाम संदेश देत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे.
राहुरीत आज शक्तीप्रदर्शनाचा स्फोट; अक्षय कर्डिले उमेदवारी अर्ज भरणार; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थितीत भव्य सभा

0Share
Leave a reply












