SR 24 NEWS

सामाजिक

महास्वामींजीच्या आशीर्वादाने जगण्यात बळ व प्रेरणा मिळते – कल्याणी आप्पा मुळे

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हागलगुंडे : शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी व गंगाधर महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने जगण्यात खऱ्या अर्थाने बळ व प्रेरणा मिळते. अशी भावना सत्कारमूर्ती कल्याणी आप्पा मुळे यांनी व्यक्त करून समाजातील वंचित घटकासाठी काम करताना स्फूर्ती मिळते. सहवासातील सहकाऱ्यांचे प्रेम व सहकार्य यांच्या पाठबळावर विविध प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळाल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

अणदूर येथील नीलकंठेश्वर मठात पट्टाभिषेक रोप्य महोत्सव समितीचे वतीने तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा महोत्सवाचे अध्यक्ष कल्याणी आप्पा मुळे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवयोगी शिवाचार्य महाराज स्वामीजी व म. नि. प्र. गंगाधर महास्वामीजी जेवळी यांच्या हस्ते फेटा, शाल ,श्रीफळ, पुष्पहार , व गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी उद्योजक संतोष मुळे यांनीही ग्रामदैवत श्री खंडोबा देवाचे फोटो देऊन कल्याण मुळे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र स्वामी म्हणाले की, सामाजिक क्षेत्रात निरपेक्ष भावनेने काम करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस लोप पावत असून कल्याणी मुळे सारखे माणसे आजही समाजात आदर्श असून नव्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी श्रीशैलं लंगडे, माणिक मुळे, राजकुमार आलूरे, गणेश स्वामी, विलास मुळे , सोमनाथ डांगे, आप्पासाहेब आलुरे, रितेश घुगरे, रामलिंग नरे सोमेश्वर आलूरेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बाबुराव मुळे यांनी केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!